

तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही तुमचा चेहरा शस्त्रक्रियेविना तरुण सुरकुत्यारहित बनऊ शकतात. सध्याच्या सौंदर्य शास्त्रातील नवीनंतर असा प्रयोग म्हणजे सिलव्हाऊट फेसलिफ्ट . ह्या प्रोसिजर मध्ये बारीक थ्रेड चेहऱ्याचा झुकलेला भाग सुरकुत्या उंचावण्यासाठी वापरले जातात आणि चेहऱ्याचा व मानेचा भरिवपणा वाढवतात. त्यामुळे शत्रक्रियेविणा आकर्षक लूक तुम्हाला मिळू शकतो.
खरतर थ्रेड लिफ्ट ही प्रोसिजर नवीन नाही. १९९० साली ही पहिल्यांदा अस्तित्वात आली पण तिची लोकप्रियता २००० साला पर्यंत संपुष्टात आली. नवीन टेक्नॉलॉजी मुळे ही प्रोसिजर लवकर आणि वेदनारहित झाली असल्यामुळे तिचे नाविण्याने पुनरागमन झाले आहे. ही प्रोसिजर फार वेगाने होत असल्यामुळे हिला लंच टाईम लिफ्ट असे टोपण नाव पडले आहे.
बहुतांशी वेळा ह्या प्रोसिजर साठी फक्त १ ते २ तास लागतात. दुसऱ्या कॉस्मेटिक प्रोसिजर च्या तुलनेत ही खूपच लवकर होते आणि चेहऱ्यावरील परिणाम ही लवकर दिसतात.
नावाप्रमाणे ह्या प्रोसिजर मध्ये बारीक विरघळणारे थ्रेडस् वापरण्यात येतात. चेहऱ्यावर जेथे ही प्रोसिजर करावयाची आहे तीच जागा बधीर केली जाते. नंतर थ्रेडस् कातडी खाली टाकले जातात आणि कातडी खालून मार्गक्रमण करून सुरकुत्या पडलेला झुकलेला भाग उंचावला जातो. मुख्यतः ह्या प्रोसिजर मध्ये गालावरील, ओठावरील, मानेवरील आणि हनुवटीवरील सुरकुत्या पडलेली कातडी उंचावली जाते आणि भुवयाही उंचावल्या जातात.
सिलव्हाऊट फेस लिफ्ट चे परिणाम हे कित्येक वर्षा पर्यन्त टिकून राहतात. थ्रेडस् ला कोण लागलेले असतात ते नवीन कोलेजन तयार करण्याचे काम त्वचेत करतात म्हणून ही प्रोसीजर झाल्यानंतर पुढील काही महिन्यांत फेस लिफ्ट चा परिणाम अजुन वृध्दींगत होतो.
सिलव्हाऊट फेस लिफ्ट ह्या प्रोसिजर ने तुम्हाला सुरकुत्यारहित तजेलदार कांती मिळते.